नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था । भारतात तयार करण्यात आलेल्या कोरोना विरोधी लसी या पूर्णपणे सुरक्षित व उपयुक्त असून कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. आज पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेस प्रारंभ करतांना ते बोलत होते.
लसीकरण मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज उद्घाटन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका. आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.