अपघातात वृध्दाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील अजिंठा चौकाती नेक्सा शोरूम जवळ रिक्षाची वाट पाहणाऱ्या वृध्दाला अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अज्ञात कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार सोमोमल दामेचा (वय-६५) रा. सम्राट कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार दामेचा हे आपल्या परिवारासह सम्राट कॉलनीत वास्तव्याला होते. गेल्या १० वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी ४ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते रात्री घरी येण्यासाठी निघाले. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील नेस्ट शोरूमजवळ ते रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी मागून अज्ञात कारने भरधाव वेगाने येवून त्यांच्या मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वृध्दाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी बुधवार ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

Protected Content