जळगाव प्रतिनिधी । जळगाव-शिरसोली रस्त्यावर सोमवारी रात्री अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत मोतीलाल पाटील (वय 37) रा. शिरसोली असे मयत तरूणाचे नाव आहे. यशवंत पाटील हे नातेवाईकांकडून लग्न आपटून जळगावहुन शिरसोली येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एम.एच.१९, एवाय ०९८६) घरी परतत असताना शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लाँनच्या पुढे पी.एम. स्टाईल दुकानाच्या जवळ मालवाहतूक गाडी (एम.एच १९,एस ८२७५) या वाहनावरील चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात यशवंत पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जळगावात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दि. २ डिसेंबर पहाटे उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयत यशवंत पाटील यांचे भाऊ भारत मोतीलाल पाटील (रा. शिरसोली प्र. बो.) याच्या फिर्यादीवरून मालवाहतूक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कोळी हे करीत आहेत.