यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर हिंगोणा गावाजवळ रात्री १० .३० वाजेच्या सुमारास डंपर आणि क्रुजर यांच्या झालेल्या अत्यंत भिषण अपघातात आतापर्यंत एकुण १२ जण मरण पावल्याचे वृत आहे. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी भेट दिली.
अपघातातील जखमींवर गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन यातील काही जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे वृत आहे . दरम्यान या भिषण अपघाताच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ .पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी तात्काळ आज सकाळीच घटनास्थळाची पाहणी करून या अपघाताच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहे . या भिषण अपघातास कारणीभुत असलेल्या डंपर चालकास फैजपुर पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती फैजपुरचे पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे यांनी दिली यावेळी घटनास्थळी पोलीस पंचनाम्याचे कार्य सुरू आहे .