चाळीसगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने एसआयटी चौकशी लावावी या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीकडून मुंबई येथे अकरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने अन्यायग्रस्त शेतकरी थेट सोलर प्रकल्पासमोर सोमवारपासून तिव्र स्वरूपाचे अंदोलन करणार असल्याचे इशारा देण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे – शिवापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी अवाजवी दराने खरेदी करून शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहेत. दरम्यान न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांना खूप झटावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊच या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शेतकरी बचाव कृती समितीने मुंबई येथील आझाद मैदानावर २१ सप्टेंबर रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. परंतु आंदोलनाचा अकरावा दिवस उलटूनही अद्याप सरकार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने आता शेतकरी थेट सोलर प्रकल्पासमोर तिव्र स्वरूपाचे अंदोलन सोमवार ३ ऑक्टोंबर पासून करणार असल्याची माहिती सचिव भिमराव जाधव यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना दिली आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून एसआयटी चौकशीचे आदेश देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भिमराव जाधव यांनी सांगितले आहे. यावेळी अध्यक्ष भरत चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक चत्रू राठोड, सचिव भिमराव जाधव, पिडीत शेतकरी, प्रकाश धर्मा चव्हाण, संतोष चिंतामण राठोड व मेहताब राजू चव्हाण आदी उपस्थित होते.