अमळनेर प्रतिनिधी। अन्नदान करून परतणार्या तरुणांची रिक्षा उलटून दोन युवक जागीच ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील झाडी गावाजवळ घडली.
अमळनेरच्या शिरूड नाका परिसरातील काही युवक अन्नदान करण्यासाठी मुडी प्र. डांगरी येथे गेले होते. परत येताना झाडी गावाच्या वळणावरच्या ढाब्याजवळ त्यांची रिक्षा उलटून ऋषिकेश उमेश शेटे (वय १८), विशाल दिनेश पाटकरी (वय २०) हे दोघे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेल्या जयेश रमेश पाटील याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.