धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आनोरे शिविरात अज्ञात वयोवृद्ध व्यक्तीचा रेल्वे मालगाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे.
धरणगाव ते चावलखेडा रेल्वे स्थानकादरम्यान सुरत-भुसावळ अप रेल्वे मार्गावर भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीखाली आनोरे शिवरात एका बेवारस अनोळखी ६० ते ६५ वर्ष वय असलेल्या वृद्ध व्यक्तीचा रेल्वे अपघात मृत्यू झाला. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चन्दूलाल सोनवणे (३३५९) हे करीत आहेत.