जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आरक्षणाचे लाभ हे निवडक जातींनाच मिळत असून इतर समाज यापासून वंचित राहत आहे. यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण करावे या मागणीसाठी आज राष्ट्रीय लहूशक्ती संघटनेतर्फे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
भारतीय संविधानातील सामाजिक न्याय – समता आधारित अनुसूचित जातीचे आरक्षणाचे अ, ब, क, ड प्रमाणे वर्गीकरण करावे या मागणीसाठी राष्ट्रीय लहुशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे खानदेश विभाग अध्यक्ष रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय धरणे आंदोलन करून निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हाआधिकारी यांच्या मार्फेत देण्यात आले. निवेदनाचा आशय आस की, स्वराज्याच्या ७५ वर्षात अनुसूचित जाती मधील समाजबांधवांमध्ये सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विकासात्मक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय तथा नोकरी विषयक सामाजिक न्याय तथा समता अर्थात सामाजिक समरसता प्रस्थापित होवू शकलेली नसून हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. तरी राज्याचे आरक्षणाचे अ, ब, क,ड वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून विषमता असलेल्या समाजामध्ये सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करावी ही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात जळगाव जिल्हाध्यक्ष सागर अंभोरे, नामदेव मोरे, संतोष शिंदे, मुरलीधर बोरसे, रामभाऊ जाधव, किरण शिरसाठ, अशोक पवार, जयदीप बागुल, गजानन चंदनशिव,भास्कर रोकडे,सुपडू शिरसाठ, संजय बिऱ्हाडे आदी सहभागी झाले आहेत.