जळगाव प्रतिनिधी । मागील अनेक वर्षांपासून महापालिकेतील अनुकंपा भरती झाली नसून ती त्वरित करण्यात यावी अशी मागणी घेऊन आज अनुकंपाधारकांनी उपमहापौर सुनील खडके यांची भेट घेत कैफियत मांडली. उपमहापौर खडके यांनी लागलीच संबधित अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलवून घेत अनुकंपाधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यात.
नोकरीचे वय निघून जात असतांना वाढत्या जबाबदारी पेलवू शकत नाही, वेळोवेळी केवळ आश्वसन दिले जात असल्याची भावना अनुकंपाधारकांनी उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे मांडली. यावेळी अनुकंपाधारकांनी त्याची फाईल आस्थापना विभागात अडकल्याने भरती प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचा आरोप केला. यावेळी उपायुक्त पवार, सहाय्यक आयुक्त डोईफोडे, अस्थापन अधीक्षक राजेंद्र पाटील यांना आपल्या दालनात बोलवून घेतले. यावेळी अनुकंपाधारक यांना कैफियत मांडतांना रडू कोसळले. लवकरात लवकर नियुक्ती मिळाली नाहीतर आपण महापालिकेच्या समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अनुकंपाधारक यांनी यावेळी दिला.
याबाबत उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यापासून मी अनुकंपाधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांच्या तीन बैठका घेतल्या आहेत. तीन ते चार वेळा आयुक्तांची वैयक्तिक भेट घेऊन अनुकंपाधारक यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. लवकरच अनुकंपाधारकांचा प्रश्न मार्गी लागेल.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1472979722905037
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/311467053507379