अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी शपथ(व्हिडिओ)

जळगाव, राहूल शिरसाळे | लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या अनुषंगाने आज अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचारविरोधी शपथ घेतली. ”तर कुणी सरकारी अधिकारी व कर्मचार्‍याने लाचेची मागणी केल्यास १०६४ हा टोल फ्री क्रमांक अथवा ०२५७-२२३५४७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. ते भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिल्यानंतर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी बोलत होते.

 

याबाबत माहिती अशी की, शासनाच्या वतीने दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने जळगाव लाचलुचपत विभागाच्या वतीने उद्या मंगळवारी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.काँ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ व संतोषदत्त सोनवणे आदी उपस्थित होते. या सप्ताहात लाचलुचपत विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अमंलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना भ्रष्टाचर निर्मुलानाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, शासकीय कामासाठी कुणाला पैश्यांची मागणी केली जात असेल तर लाचलुचपत विभागाला त्वरीत माहिती देण्यात यावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/405291207731767

 

Protected Content