अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बँक मॅनेजर अद्याप फरारच

रावेर प्रतिनिधी । एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी खानापूर सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होवून दीड महिना झाला परंतू अद्याप संशयित आरोपी हे फरारच आहेत.

पोलीसांच्या ढिलाईपणामुळे संशयित आरोपी हे फरार आहेत अशी प्रतिक्रिया पीडीत तरूणीने दिली आहे. तालुक्यातील एका २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत  वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पीडित तरुणीने येथील पोलिसात १५ आगष्टला  गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात खानापूर येथील सेंट्रल बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे मुख्य आरोपी असून अन्य चार जणांचा या गुन्ह्यात समावेश आहे.

 

Protected Content