यावल, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः हाल झाले आहे. त्यामुळे तात्काळ अतिवृष्टी धारकांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेस सेवा फाउंडेशनने केली आहे.
तालुक्यात विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, मका, कपाशी, सोयाबीन अशा अनेक खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने पंचनामे करून सरकार कडे पाठविण्यात आले आहे. बराच कालावधी उलटुन ही केन्द्र शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली होती. व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई तसेच पिकविम्याची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तरी दिवाळी होऊन २ महिने झाले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई तसेच पिकविम्याची रक्कम अजून पर्यंत जमा झाली नसून सदर रक्कम येत्या ८ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अन्यथा यावल तहसील कार्यालया समोर १० जानेवारी रोजी पासून आमरण उपोषण सुरू करू अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रामुख्याने सरपंच परिचदेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, महेलखेडी सरपंच शरिफाताई तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, काँग्रेस सेवा फौंडेशनचे शहराध्यक्ष नईमभाई शेख, काँग्रेस सेवा फौंडेशनचे रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम सेठ शाह, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, दहिगावचे माजी सरपंच सत्तार तडवी, कोरपावलीचे उपसरपंच प्रतिनिधी मुक्तार पटेल, कोरपावलीचे ग्राप सदस्य आरिफ तडवी, सिकंदर तडवी, वाढोदे गावचे उपसरपंच गोपाळभाऊ चौधरी, नानाभाऊ सोनवणे, चेतन सोनवणे, रहेमान खाटीक, अनिल जंजाळे, टाकरखेडा येथील अनिल कोळी, आत्माराम महाजन, निसार शेख, काँग्रेस सेवा फौंडेशनचे तालुकाउपाध्यक्ष याकूब खान, सह शेतकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, मदत पुनवर्सन मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात येतील आणि आपण पण प्रशासना मार्फत पाठवाव्या अशी विनंती करण्यात आली आहे.