जळगाव, प्रतिनिधी । काल जळगाव शहरात शेतकरी, हातगाडीधारकांची अडवणूक करत अतिक्रमण करत असल्याचा ठपका ठेवून, शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त करणे, भाजीपाला रस्त्यावर फेकून देणे यासारख्या गोष्टी करून त्रास देणाऱ्या महापालिकेचे अतिक्रमण अधीक्षकएच. एम, खान यांचा पदभार काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापौरांकडे केली आहे.
मनपा अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी काल शेतकऱ्यांना त्रास दिला व गाड्या जप्त करण्याच्या धमक्या दिल्यात. यावर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका म्हणून सांगायला गेलो असता न जुमानता अरेरावी केली. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे काल महापालिका उपायुक्त संजय वाबळे, महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे अतिक्रमण अधीक्षक खान यांच्याकडून त्यांचा पदभार काढून घेण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन करण्यात आली. याप्रसंगी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील व त्यांच्यासमवेत युवक महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, महानगर सचिव अँड.कुणाल पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, राजू सोनार, सुशील शिंदे उपस्थित होते.