*भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | शहरात नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण काढण्यात येत आहे. याला प्रहार जनशक्ती पक्षाने विरोध दर्शविला असून याविरोधात एकदिवसीय उपोषण करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले आहे.
भुसावळ शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शहरातील जामनेर रोड, खडका रोड, यावल रोड या परिसरातील आणि शहरातील ज्या- ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. ते काढून टाकण्यात येत आहे. या अतिक्रमण काढण्याचे विरोधात आज प्रहार शक्ती पक्षाच्यावतीने भुसावळ शहरातील शासकीय विश्राम ग्रह मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अतिक्रमण काढण्याच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाचा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी फ़िरोज़ रहेमान शेख (अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष), केदार भाऊ सानप (कामगार अघाड़ी जिल्हा अध्यक्ष), खन्ना भाऊ कोळी (शहर अध्यक्ष भुसावल); सनी गोने (युवा शहर अध्यक्ष भुसावल)
कलीम शेख (अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष) अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.