फैजपूर, ता. यावल । तालुक्यातील साकळी येथील रहिवासी, माजी जि.प. सदस्य अण्णासाहेब सूर्यभान हिरामण पाटील (वय ८७) यांचे रात्री निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अण्णासाहेब सूर्यभान हिरामण पाटील हे जनसंघापासून ते भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. ते साकळीचे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांचे दि.८ रोजी रात्री ११-१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.९ रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरून निघणार आहे. ते जळगाव जि.प.शिक्षण,क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील (छोटुभाऊ), रेल्वे कर्मचारी विजय पाटील तसेच नरेंद्र पाटील यांचे वडील तर साकळी येथील सरपंच सौ.सुषमा विलास पाटील यांचे सासरे होत.