यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा ते अट्रावल या श्री मुंजोबा महाराज यांच्या प्रसिद्ध मंदीराच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याचे व गावाजवळील पुलाचे हे संपुर्ण काम मागील एक वर्षा पासून पडून आहे. हे काम तातडीने मार्गी लावावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री मुंजोबा महाराज यांच्या मंदीरावर भरणाऱ्या यात्रेमुळे प्रसिद्ध असलेले अट्रावल या गावासाठी शासनाकडुन लाखो रुपये खर्च करून चितोडा ते अट्रावल दरम्यान रस्ता व अट्रावल गावाजवळी नदीवर मोठया पुलाच्या मान्यता मिळून कामास सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र काही कारणामुळे हे काम मागील एक वर्षापासून बंद पडले आहे.
एक वर्षापासून बंद असलेल्या कामामुळे पादऱ्यांना व वाहनधारकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे . सदर काम कोणत्या कारणांमुळे रखडले आहे याची विचार केली असता यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याने सदरचे काम हे कधी पुर्ण होईल असा प्रश्न निर्माण झाला असुन , यंदाची पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या श्री मुंजोबा महाराजच्या प्रसिद्ध यात्रोत्त्वासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना या रस्त्यामुळे व पुला अभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपानिभागीय अधिकारी जहाँगीर तडवी यांनी जळगाव येथील कामाचे ठेकेदार यांना ३० सप्टेंबर २०२२ रोजी पत्र पाठवुन कामास सुरुवात करावी असे सुचीत करण्यात आले आहे .