अट्रावलच्या मुंजोबाची यात्रा यंदा रद्द

यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान येथील सालाबादाप्रमाणे भरणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे

यंदा दिनांक १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत होणारी यात्रा यंदा कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली आहे .यावल येथील तहसील कार्यालयात तहसिलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३ फेब्रुवारीरोजी बैठक झाली यात मुंजोबा देवस्थानाची यात्रा यंदा रद्दड करण्याचा निर्णय घेण्यात आला

यात्रोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश , गुजरात या राज्यातुन लाखो भाविक येत असतात यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी इतर दिवशी देखील दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंजोबा यात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

यात्रेत आकाश पाळणे , लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने , महीलासाठी मिळणारी संसार उपयोगी वस्तुंची दुकाने लाकडी तसेच इतर साहित्यची दुकाने , हॉटेल्स , थंडपेय विक्रीची दुकाने यांना परवानगी दिली जाणार नाही
.बैठकीस पोलीस उप निरिक्षक ए आर पठान, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले तसेच देवस्थानाचे विश्वस्त ललीत कोळी, दिपक तायडे, प्रभाकर कोळी, अनिल कोळी , जनार्दन कोळी, विक्रम कोळी व अट्रावल पोलीस पाटील पवन चौधरी उपस्थित होते .

 

Protected Content