धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील जैन इरिगेशन कंपनीसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणारे प्रौढ व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल छगन नन्नवरे (वय-४५) रा. बांभोरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात सुनिल नन्नवरे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होतो. मोलमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुनिल नन्नवरे हे कामावरून घरी पायी जात असतांना जैन कंपनीसमोर एका अज्ञात वाहनाने मागून येवून जोरदार धडक दिली. या धडकेत सुनिल नन्नवरे हे जागीच ठार झाले. तर धडक देणारा वाहनचालक हा वाहन घेवून पसार झाला होता. या घटनेबाबत मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे.