जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अजिंठा रोडवरील फर्निचर मॉल येथे आज शाळू माती व नैसर्गिक मातीने केलेल्या गणपतींच्या मुर्ती विघ्नहर्ता प्रदर्शनाचे प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.
संपूर्ण देशाला व महाराष्ट्राला चाहूल असलेले श्री गणेशाचे आगमन लवकरच होणार असून शाळू मातीच्या व नैसर्गिक मातीने तयार केलेल्या गणपतींच्या मूर्तीचे प्रदर्शनाचे विघ्नहर्ता प्रदर्शनाचे आयोजन फर्निचर मॉल जवळ, अजिंठा रोड सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनामध्ये पर्यावरणाचे समतोल राखून व्हाईट टोन गणेशा, डिझायनर गणेश मूर्ती, वेल्वेट टोन गणेश मूर्ती, ट्री गणेशा, शाळू मातीने, नैसर्गिक रंगाने, कागदापासून तयार केलेले श्री गणेश मुर्त्या उपलब्ध आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी या ठिकाणी असलेल्या मुर्त्यांचे सजावट व उत्कृष्ट कलाकृती बघून विघ्नहर्ता प्रदर्शन आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी स्नेहल शैलेश काबरा, हितेश पटेल, शांती पटेल, सुधीर पटेल, अमृत पटेल, शैलेश काबरा, बबलू भोळे आदी उपस्थित होते.