Home Cities जळगाव अखेर जिल्हा परिषदेला लाभले नियमित अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी

अखेर जिल्हा परिषदेला लाभले नियमित अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी

0
50

जळगाव, प्रतिनिधी  ।  येथील रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी पदावर धुळे जि.प ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब मुरलीधर मोहन यांची बदली झाली आहे.

 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश चौधरी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृतीनंतर गेल्या काही महिन्यापासून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी  पद प्रभारी होते. सध्या डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे.  शासनाकडून आज १४ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. त्यात बाळासाहेब मुरलीधर मोहन यांचा देखील समवेश आहे. ते  लवकरच रूजू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound