अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाची बैठक संपन्न

वरणगाव, प्रतिनिधी । येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या बैठकीत भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अक्षय बेंडाळे यांची निवड विस्तार नियोजन बैठकीत जाहीर करण्यात आली

 

भुसावळ , बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यापार्श्वभुमीवर पदविस्तार व  नियोजन करण्यासाठी आढावा बैठक नागेश्वर मंदिर वरणगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात  प्रदीप ( बंडू ) भोळे यांनी  शेती बरोबरच पूरक जोड धंदा व आधुनिक शेती केल्याने युवक बरोजगारीवर मात करून समाजाची उन्नती होईल आणि गावोगावी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखा लावणे व समाजकार्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन केले.  युवकांनी  भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये  महासंघाच्या २० शाखा तयार केलेल्या आहेत.  लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे,  सरदार वल्लभभाई पटेल जयंतीपर्यंत १००  शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट आहे. उपस्थित सर्वानुमते आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य  अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांचा  प्रदेशाध्यक्ष प्रदीप ( बंडू ) भोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार अमोल कोल्हे यांनी मानले.  कार्यक्रमात अक्षय दिलीप बेंडाळे , ऋषिकेश कोलते, आकाश डिंगबर पाटील , रोशन अरुण इंगळे , सागर उद्धव पाटील , मयूर अनिल इंगळे , विशाल विनोद पाटील , प्रदीप रमेश वारके , कुणाल सुरेश नेमाडे , नरेंद्र पुरुषोत्तम पाटील , शुभम ज्ञानदेव पाटील , रुपेश अरुण पाटील , प्रतीक संजय इंगळे , प्रणव निलेश पाटील , लोकेश सुधाकर पाटील, संकेत संतोष वारके , प्रवीण मधुकर इंगळे , प्रथमेश यादव पाटील , जितेंद्र शेणफळू पाटील , ऋषिकेश विजय पाटील , विशाल सुरेश नेमाडे , विष्णू इंगळे , चेतन रवींद्र भोळे , कल्पेश उखर्दू  पाटील , लोकेश राजेंद्र खाचणे , शुभम किशोर खर्चे , दशरथ दिलीप पाटील , गोविंदा जनार्धन पाटील , देवेंद्र विष्णू इंगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

 

Protected Content