पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांची सभा पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रकुमार सोनवणे, जिल्हा सरचिटणीस देवेंद्र पाटील, कार्याध्यक्ष योगेश इंगळे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे संपन्न झाली.
सदरील सभेस ग. स. सोसायटी जळगाव अध्यक्ष उदय पाटील, ग. स. सोसायटी कर्मचारी नियंत्रण समिती अध्यक्ष अजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील संघटनेत जिल्हा कार्यकारणीत तालुक्यातील सर्व बापूसाहेब गुलाबराव दौलतराव पाटील (जिल्हा जेष्ठ सल्लागार), सुनिल युवराज पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), प्रवीण आत्माराम पाटील (जिल्हा चिटणीस), सुभाष देसले (जिल्हा सल्लागार), गोपाल पाटील (जिल्हा संघटकपदी) नियुक्त्या करण्यात आल्या.
विविध पदांची नियुक्त्या
अखिल पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी प्रवीण रमेश पाटील, सरचिटणीसपदी जितेंद्र खंडू वानखेडे, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप शिंदे, तालुका कोषाध्यक्षपदी रामकृष्ण दगा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुकास्तरीय विविध पदांवर नियुक्ती करण्यात आल्यात. सर्वांचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संपुर्ण कार्यकारणीला शुभेच्छा देऊन शिक्षकांच्या विविध समस्या शासन दरबारी सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमात प्राथमिक शिक्षक रमेश पाटील (जामनेर) व इतर सहकारी यांचे जिनियस फाउंडेशन अंतर्गत विशेष कामगिरी केल्यामुळे जिल्हा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांनी केला.
यांनी झाली निवड
पाचोरा तालुका कार्यकारणीत सर्वश्री विजय धनराळे, वासुदेव पाटील, सुरेश पाटील, राजीव पदमे, शांताराम कुंभार गुणवंत पवार, एकनाथ देवरे, प्रकाश महाजन, विनायक राऊतराय, मनोज दुसाने, दिलीप पाटील, महेश रोकडे, सुरेश कदम, किरण वेले, अनिल जाधव, रवींद्र शिंदे, रवींद्र शिंपी, मनोहर पवार, जिजाबराव पाटील, अमरचंद चौधरी, सचिन पाटील, दीपक पाटील, संदीप उदावंत, दत्तात्रय खैरनार, किशोर पाटील, सुनील खैरनार, प्रवीण जोहरे, अतुल साळुंखे, धर्मराज देवरे, शंकर कोळगे, वीरपाल सिंग पाटील, योगेश जाधव, दीपक सोनवणे, नाना पवळ, दिलीप सोनवणे, संजय बाविस्कर, रमेश महालपुरे, दीपक धनगर, मनोहर सोनवणे, दिनेश पवार, संजय प्रजापत, अमरसिंग पाटील, भटुकांत चौधरी, दिनेश मनोरे, सारंगधर नन्नवरे, दीपक साळुंखे, रवींद्र इजारे, वासुदेव चव्हाण, सय्यद करीम सय्यद मोहम्मद अली, मोहम्मद सादिक शेख, रईसखान सुभान खान, अब्दुल सत्तार शेख अन्सार, मोहम्मद मोबीन मुलकोदिन, एजाज अब्दुल रउफ, इत्यादींची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
सदर कार्यक्रमास इतर संघटनांचे अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संघटना, भैय्यासाहेब सोमवंशी तालुका अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, विलास पाटील तालुका अध्यक्ष शिक्षक समिती, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात निळकंठ पाटील, अविनाश देवरे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, प्रदीप सोनवणे, सुरेश पाटील तसेच जि. ग. पाटील, जगदीश देसले, सुभाष गोसावी, संजय पदमे, दिलीप बाविस्कर, दिलीप शिरसाठ, व्यंकट बोरसे, सुनील निकम, संजय पदमे, दिलीप साळुंखे, आर. के. पाटील, गोपाल पाटील, शिवाजी बोरसे, संजय पाटील, तुळशीराम वाघ, विनोद जीवराम पाटील, विनोद भगवान पाटील, मनोहर सोनवणे, दीपक काकळीज, बाळकृष्ण सोमवंशी, सलाउद्दीन शेख, राहुल पाटील, मधुकर ब्राह्मणे, विश्वनाथ भिवसने, साहेबराव सुरवाडे, किरण महाजन, राहुल महाजन, रवींद्र महाजन, प्रकाश महाजन, दीपक गोसावी, दिलीप महाजन, नारायण राठोड, दिनेश पाटील, तुळशीराम वाघ, सैंदाणे नितीन खोंडे, रवींद्र इजारे, योगेश तागड, रणजित परदेशी, रामकृष्ण बडगुजर, विजय बडगुजर, समाधान गोलाईत इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रवीण पाटील, सुत्रसंचलन सुरेश कदम व आभार प्रवीण आत्माराम यांनी केले.