Home Cities चाळीसगाव अखंड हरिनाम सप्ताहात युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती (व्हिडीओ)

अखंड हरिनाम सप्ताहात युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती (व्हिडीओ)

0
45

h.bh .p.

 

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज दि. 12 ऑगस्ट रोजी सांगता करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला युवानेते मंगेश चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दि. 5 ऑगस्ट पासून करण्यात आली होती. दि. 11 ऑगस्ट रोजी पालखी सोहळाचे आयोजन केले असून ही पालखी दुपारी 3 वाजेच्या सुमारास काढण्यात आली. आज अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांनी केली. किर्तन संपल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प मच्छिंद्र महाराज उपस्थित होते. समस्त ग्रामस्थ व नवतरुण मंडळतर्फे ह.भ.प. भजनी मंडळ, ब्राम्हणशेवगे यांनी आयोजक केले होते.


Protected Content

Play sound