जळगाव, राहूल शिरसाळे । आकारावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला असून आज शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कोरोनामुळे यावर्षी दहावीची परीक्षा न घेता वर्षभरात घेण्यात आलेल्या आभ्यासावर आधारित गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला होता. २० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ही प्रवेश ऑफ लाईन प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. दरम्यान, डॉ. अण्णासाहेब जे डी. बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालय येथे देखील आकारावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी प्रवेश अर्ज भरतांना विद्यार्थिनीमध्ये उत्साह दिसून आला. डॉ. अण्णासाहेब जे डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीये संबंधित अधिक माहिती देतांना उप प्राचार्या सुनिता पाटील यांनी सांगितले की, कोरोना संबधित शासनाच्या नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाविद्यालयात ८४० विद्यार्थिनीना अकरावीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. यात कला शाखेसाठी २४०, वाणिज्य शाखेसाठी ३६० तर २४० विद्यार्थिनी या विज्ञान शाखेसाठी प्रवेश दिला जाणार आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम १०० विद्यार्थिनी लाभ घेऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/337021994803122