फैजपूर, प्रतिनिधी । येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दुधउत्पादकानां भावफरक, बोनस व डिव्हिडंड जाहीर करण्यात आला आहे.
अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दुधउत्पादकानां म्हशीच्या दुधावर प्रतिलिटर तीन रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलिटर अडीच रुपये भावफरक तसेच या सर्व दुधावर प्रतिलिटरवर पन्नास पैसे बोनस,१२ टक्के डिव्हिडंड देण्याचे ४४ व्या सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. ही सभा चेअरमन हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सभेत विषय पत्रिकेवर १८ विषय घेण्यात आले होते. या सर्व विषयांवर चर्चा होऊन सभेत १७ विषयांना मंजुरी देण्यात आली. संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे. दूध ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी या दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या ३७४ इतकी आहे. तर भागभांडवल ४ लाख ९१ हजार ७०० व बक्षिस वितरण सोडून ५ लाख ५६ हजार २३५ इतका नफा असून दूध उत्पादकांकडून प्रति दिन १३०० लिटर दुध पुरवठा होतो. तर संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण केले जाते. विशेष म्हणजे या संस्थेने फैजपुर शहराची वाढती व विस्तारामुळे अस्तित्वात आलेल्या नविन रहावाशी वस्त्यांसह शहराचा सेवाभावी विचार करून शहरात सर्वप्रथम स्वर्ग रथ व शवपेटी उपलब्ध केली, त्यामुळे विशेष करून कोरोना काळात या संस्थेला समाजसेवेची संधी मिळाली. दरम्यान, दूध उत्पादकयांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे या संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते. या सभेत नफ्याच्या रकमेतून संस्थेने दूध उत्पादकांना बक्षिस वितरित केले. सभेचे प्रास्ताविक चेअरमन हेमराज चौधरी यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ संचालक भास्करराव चौधरी यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन नितीन राणे, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे, डिंगबर कोल्हे, मोहन वायकोळे, रमेश झोपे, जितेंद्र भारंबे, अजय महाजन, लक्ष्मण झांबरे, उमाकांत भारंबे, विनोद चौधरी, विजय पाटील, वंदना कमलाकर कोल्हे, ज्योत्स्ना मोतीराम भारंबे, सेक्रेटरी सुनील क्षत्रिय, दूध शित केंद्र प्रमुख सागर भंगाळे, अमोल धांडे उपस्थित होते. यावेळी दुधउत्पादक उपस्थित होते.
दुध उत्पादक समाधानी : चेअरमन चौधरी
चेअरमन हेमराज चौधरी यांनी सांगितले की, संस्था प्रगतीपथावर असल्यामागे संचालक मंडळ,कर्मचारी व दुध उत्पादकांचा सिंहाचा वाटा आहे. दूध ग्राहकांनी टाकलेला विश्वासावर या संस्थेचा प्रगतीचा पाया भक्कम आहे. दूध उत्पादकांचे हित जोपासून संस्थेने दुधउत्पादकानां म्हशीच्या दुधाच्या प्रतिलिटरवर तीन रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलिटर अडीच रुपये भावफरक तसेच या सर्व दुधावर प्रतिलिटरवर पन्नास पैसे बोनस, १२ टक्के डिव्हिडंड देण्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर केले आहे. त्यामुळे दूध उत्पादक सुध्दा समाधानी आहे.