जळगाव प्रतिनिधी । अंतिम सत्राच्या परिक्षासंदर्भात महाविकासआघाडी सरकारने निर्णय दिला आहे. विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाईल असा निर्णय मंत्रीमंडळाने रविवारी घोषीत केला. ही मागणी एनएसयुआयने केली होती. त्यास यश आले असून निर्णयाचे एनएसयुआय संघटनेने स्वागत केले आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, या निर्णयामुळे राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षातील सत्राच्या गुणांच्या सरासरी एवढे गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल, त्यांना परत परीक्षा देण्याची संधी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे
एनएसयुआयच्या मागणीला यश
एनएसयुआय संघटनेच्या माध्यामातून २१ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिक्षणमंत्री तथा राज्यपाल यांच्याकडे मागणी केली होती. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ८ मे रोजी अंतिम वर्ष सोडता इतर सर्व वर्गाच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अंतिम वर्षाच्या परिक्षाही रद्द करावी अशी मागणी केली. एनएसयुआय संघटनेच्या माध्यामातून केलेल्या मागणीला यश आले असल्याची माहिती एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली.
राहिलेल्या विषयांसदर्भात विद्यार्थ्यांनी कुठेही गोंधळून जाण्याची गरज नाही. अंतिम वर्षामध्ये प्रवेश असणार्या व अंतिम वर्षाचे परीक्षेचे अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मागील विषयांसह उत्तीर्ण केले जाणार आहे, जेणेकरून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आपली पदवी मिळण्यापासून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही व त्यांना भविष्यामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही या उद्देशाने व जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या मागणीच्या आधारे महा विकास आघाडी सरकारने या प्रकारचा निर्णय जाहीर केलेला आहे. लवकरच विद्यापीठांच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अधिकृतरीत्या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या परीक्षेसंदर्भात मधील विस्तृत निर्णय जाहीर केला जाईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी घरातच रहावे व सुरक्षित रहावे अशा प्रकारचे आव्हान जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.