अंडाभुर्जी घेण्यावरून खेडी येथील तरूणाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून खेडी येथील अंडाभुर्जी देण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुबोध अवचित वानखेडे (वय-२१) रा. खेडी बु ॥ ता. जि. जळगाव हा सेटींग काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील शाळेजवळ असलेल्या अंडापाव विक्री करणाऱ्या हातगाडीजवळ येवून अंडाभुर्जी पर्सल मागितले. परंतू दुकानदार भुषण संजय शिरसाठ याने मागुन येणाऱ्या ग्राहकांना लवकर देत होता. हा जाब विचारला असता दुकानदार भुषण संजय शिरसाठ याने शिवीगाळ करून मारहाण केली. अंडाभुर्जी बनविण्याचा लोखंडी तवा सुबोध वानखेडेच्या डोक्यात टाकला. यात सुबोध गंभीर जखमी झाला. तसचे दुकानदार भुषण शिरसाठ यांची आईने देखील चापटा व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली यातच सुबोध बेशुध्द झाला होते. नातेवाईकांनी जखमीवस्थेत खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुबोध वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भुषण शिरसाठ व त्याची आई यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे करीत आहे. 

 

Protected Content