यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे अंजाळे शिवारात गावठी दारू बनविण्याच्या दोन हातभट्ट्या पोलीसांनी उध्वस्त केले. यात २८ हजार रूपयांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून एकाला अटक केली असून दुसरा फरार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंजाळे शिवाराजील तापी नदी काठी व परीसरात संचारबंदीच्या काळात बेकायदेशीर गावठी दारू बनविण्याच्या दोन हातभट्टी सुरू असल्याची माहिती यावल पोलीसांना मिळाली. यावल पोलीसांनी सकाळी तापी नदीत उतरून गावठी दोन हातभट्टी उध्वस्त केल्या. यात दारून बनविण्याचे साहित्य हस्तगत करून सुमारे २८ हजार रूपये किंमतीचे उकळते रसायन नष्ट केले. याप्रकरणी संशयित आरोपी गोपाकळ भागवत सपकाळे रा. अंजाळे ता.यावल याला अटक केली असून दुसरा सहकारी फरार झाला आहे. पोकॉ निलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागपाल भास्कर करीत आहे.