भुसावळ/यावल प्रतिनिधी । यावल-भुसावळ दरम्यान असलेल्या अंजाळे घाटात अंधाराचा फायदा घेत काही दरोडेखोरांनी मार्गावरील आठ ते दहा ट्रकचालकांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रकार मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, देशात व राज्यात सध्या संचारबंदी असून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठ्यास शासनाची परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेच्या ट्रकवर भुसावळ ते यावल दरम्यान असलेल्या अंजाळे घाटात अज्ञात दरोडेखोरांनी दबा ठेवत आठ ते दहा ट्रकवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. ही घटना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. दरेडोखोरांनी ट्रक थांबवून शस्त्रांचा धाक दाखत त्यांच्याजवळ असलेले पैसे व इतर साहित्य लुटून नेला आहे. याप्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरमयान महिनाभरापुर्वी असाच प्रकार दुचाकीधारकांवर देखील अश्याच प्रकारच्या घडना घडली होती. याबाबत यावल पोलीसांना माहिती देण्यात आली होती. मात्र याकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे.
भुसावळातील पोलीसांना ट्रकचालकांनी दिली माहिती
अंजाळा घाटामध्ये दोन ट्रक चलकांवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना जखमी करून पैसे लुटण्यात आल्याची माहिती ट्रक चालकांनी रात्री 11.00 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ प्रभाकर चौधरी यांना दिली. अंजाळा घाटात नेहमी लूट करण्याचे प्रकार सुरू असतात. या घाटातून नेहमी ट्रकचालक चोपडा भागातून माल घेऊन येत असतात. देशात संचारबंदी असल्याने सर्वत सन्नाटा असल्याने गावाच्या लगतच्या काही टोळीने ट्रक चालकांना लुटण्याचा प्रकार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये ट्रक चलकांकडून मोबाईल, पैसे लुटण्यात आलेले आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ प्रभाकर चौधरी हे रात्री पोलीस स्टेशनला ड्युटी करीत असतांना रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवणाचा डब्बा घेण्यासाठी जात असतांना दोन ते तीन ट्रक गांधी पुतळ्याजवळ उभी होती. त्यांना कुठे जात आहे हे विचारणा केली असता त्यांनी अंजाळा घाटात झालेला प्रकार चौधरींना सांगितला. ताबडतोब यावल पोलीस स्टेशनला फोन लावून अंजाळा घाटात गाडी पाठवा, अशी माहिती ठाणे अंमलदार यांना दिली.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००