यावल, प्रतिनिधी । अंकलेश्वर बुऱ्हाणपूर या राज्यमार्गाला खासदार हिना गावित यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश करण्याची तत्त्वतः मान्यता दिली आहे.
अंकलेश्वर बुऱ्हाणपूर हा मार्ग मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात या तिन राज्याला जोडणारा महामार्ग असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची ठिकठिकाणी मोठमोठे खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. याचा सर्व वाहनधारकांना याचा त्रास भोगावा लागत होता व या महामार्गाला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा शहादा तळोदा व शिरपूर या तालुक्यांचा समावेश असल्याने खासदार डॉ. हिना गावित यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आज ना. नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर ना. गडकरी यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश करून याबाबतची अधिसूचना काढल्याचे स्पष्ट केले आहे. या मार्गाचा कायापालट होणार असून गेल्या अनेक वर्षापासुन पादचाऱ्यांपासुन तर वाहनधारकांची डोकेदुखी ठरणारे यावल शहरातील बस स्थानकापासुन ते जुना चोपडा नाक्यापर्यंतचे अतिक्रमण आता कायमचे हद्दपार होणार आहे. बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तळोदा शहादा शिरपूर चोपडा यावल फैजपूर रावेर व बऱ्हाणपूर असा असणार असून सुद्धा खासदार डॉ. हिना गावित यांच्या अथक परिश्रमाने आणि केलेल्या पाठपुराव्याने या राष्ट्रीय महामार्गाला आता तत्वतः मंजुरी मिळाली आहे.