जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहुनगरातील नुरानी मशीद परिसरात सट्टा खेळणाऱ्यांवर शहर पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी एका तरूणाला ताब्यात घेतले असून त्याचे साथिदार फरार झाले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, चेतन संजय पिसाळ (वय २५, रा. शाहुनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. चेतन हा काही तरुणांसह परिसरात सट्टा खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता छापा मारला. पोलिस आल्याची चाहुल लागताच इतर तरुण पळुन गेले. तर चेतन याला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. रतनहरी गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. चेतन याच्याकडून सट्टा खेळण्याचे साहित्य व पैसे पोलिसांनी जप्त केले.
यांनी केली कारवाई
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते, पो.ना. गणेश शिरसाळे, पोकॉ तेजस मराठे यांनी कारवाई केली. त्यांच्या तब्यातील जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोक रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.