रामचंद्र नगरात घरासमोर उभी चारचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील आयोध्या नगर परिसरात जानवी हॉटेल समोरून उभी चार चाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी गुरुवार 15 जून रोजी रात्री सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव तालुक्यातील आसोदा गावात पराग चंद्रकांत पाटील हे वास्तव्यास आहेत. पराग चंद्रकांत पाटील यांच्याकडे एम एच 19 बी यु 0500 या क्रमांकाची चार चाकी आहे . ही चार चाकी त्यांनी बुधवार 14 जून रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आयोध्या नगरातील जानवी हॉटेल समोर असलेल्या रामचंद्र नगरात राहणाऱ्या मामाच्या घरासमोर मोकळ्या जागेत उभी केली होती. सकाळी सहा वाजेच्या सुमारास पराग पाटील यांचे मामा कृष्णा शिंदे हे उठल्यावर त्यांना गाडी दिसून आली नाही.  त्यांनी पराग पाटील यांना गाडी घरी नेली आहे का याबाबत विचारणा केली मात्र पराग पाटील यांनीही मी गाडीत नेलेली नसल्याचे सांगितल्यावर गाडीचा शोध सुरू झाला. सर्वत्र शोध घेऊनही चार चाकी मिळून न आल्याने चोरट्याने ही चार चाकी चोरून नेल्याची पराग पाटील यांची खात्री झाली. त्यानुसार पराग पाटील यांनी दुसऱ्या दिवशी गुरुवार 15 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून त्यांची चार लाख वीस हजार रुपये किमतीची चार चाकी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content