यावल येथे माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

यावल येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात माजी खा.डॉ .उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ग्रामस्तरीय काँग्रेस कमेटी व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी करणे संदर्भात दौऱ्याखाली प्रमाणे २२ / ०६ डांभुर्णी, उंटावद,दोनगावं, चिंचोली आडगाव,कासारखेडा गट २४ / ६ साकळी दहिगांव गट२७ / ६ सावखेडा-हिंगोणा गट. २९ / ६ न्हावी -बामणोद २७ / ६ भालोद-पाडळसा गट या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील,शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,सरपंच परिषदे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, माजी नगरसेवक रसूल मेंबर, धनु बऱ्हाटे, भरत चौधरी, मारुळचे सरपंच असदभाई सेय्यद, कॉंग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईम शेख, तौफिक शेख,शेख रियाज, हाजी गफ्फार शाह, विक्की पाटील, अमर कोळी,लीलाधर सोनवणे, डॉ. योगेश पालवे, नितीन चौधरी भालोद, सचिन तडवी, मतिमूर रहमान, तौफिक खान, नदीम पिंजारी, महेश राणे योगेश पाटील,अक्षय सोनवणे, सचिन तडवी, उस्मान तडवी, योगेश पाटील, दिनकर फेगडे सह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

Protected Content