बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल ! : बच्चू कडू

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष  बच्चू कडू यांनी खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

 

राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या मोठा विसंवाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांनी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीतून सुरू झालेला वाद हा दुसर्‍या दिवशीच्या जाहिरातीनंतर देखील सुटलेला नाही. यातच नेत्यांचे आपसात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काल अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिका केली होती. याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले होते. तर आता या वादाच बच्चू कडू यांनी देखील उडी घातली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची लायकी नाही, त्यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. डॉ. बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली, त्याचा आम्ही निषेध करतो. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल, भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळावे, अन्यथा आम्ही योग्य उत्तर देऊ, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल असे देखील ते म्हणाले.

Protected Content