प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशचे निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या प्रलंबित विनंती बदल्या तात्काळ कराव्यात या मागणीसाठी अयोध्यानगरातील महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी ९ मे रोजी दुपारी दीड वाजता द्वारसभा आणि निदर्शने करण्यात आले.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे की, महावितरण कंपनीतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी गेल्या ३ वर्षापासून गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, अपंग, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे, सेवानिवृत्ती दोन वर्ष शिल्लक आहेत, मूळ रहिवाशी ठिकाणापासून ८०० ते १००० किलोमीटर अंतरावर कार्यरत असलेल्या अशा विविध कारणे विनंती बदल्या मागत आहेत. विनंती बदल्याचे धोरण ठरविण्यास महावितरण कंपनीच्या प्रशासनाचे नियोजन व वेळच नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर बैठक घेण्यास सुद्धा महावितरण कंपनी प्रशासनास वेळ मिळत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पदोन्नती वेळोवेळी आणि सोयीनुसार केल्या जातात. महावितरण कंपनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात प्रचंड चीड बदली करीता इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये व्याप्त आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरीता महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना आंदोलनाची नोटीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने दिलेली होती.

या अनुषंगाने अयोध्या नगरातील महावितरण कार्यालयाजवळ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्यावतीने मंगळवारी ९ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास द्वारसभा आणि निदर्शने करण्यात आलीत. याप्रसंगी संघटनेचे परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील, प्रसिध्दी प्रमुख देविदास सपकाळे, सर्कल सेक्रेटरी दिनेश बडगुजर, महिला आघाडीच्या सदस्या संध्या पाटील, विजया कोळी, सुषमा पाटील, प्रभाकर महाजन, किशोर जगताप, मुकेश बारी, अनिल धोबी, गिरीष बऱ्हाटे, सचिन फड, नागेश पारधी, मनोज जिचकार, दीपक बडगुजर, हेमंत बारी, शरद बारी, अशोक सुरवाडे, संदीप तायडे, सागर पाथरवट, निखिल पटले, भगवान बारी, किशोर सपकाळे, अमोल वाडीभस्मे, गणेश सातपुते, सुभाष भालेराव, किरण चव्हाण, मुकेश बारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content