पानटपरीधारकाला जमावाकडून मारहाण; दुचाकीचेही केले नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील शाळेच्या प्रांगणात पानटपरीतील सामान उधारीने देण्यास नकार दिल्याच्याकारणावरून पानटपरी धारकास बेदम मारहाण केली तर दुचाकीला दगड मारून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २१ मे रोजी रात्री उशीरा  एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत (वय-२२) रा. रामदेव बाबा मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. २० मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास टपरी बंद करून उमेश राजपूत हा घरी जात होता. पानटपरीतील सामान उधारीने देत नसल्याच्या कारणावरून शारदा शाळेच्या प्रांगणाजवळ किरण चितळे, विजय मराठे, बेंडा बाप्या, आकाश पोदे, पप्पु माचिस, रोहित (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांनी शिवीगाळ करून उमेश राजपूत याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. यातील काहींनी उमेशच्या दुचाकीला दगडे मारून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्याानंतर उमेश राजपूत याने २१ मे रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content