पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयत झालेल्या ‘त्या’ तरूणाची ओळख पटली

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३/९/११ जवळ एका अनोळखी इसमाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह २१ जुन रोजी आढळुन आला होता. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी जावुन घटनास्थळा पंचनामा केला असता मयत इसमा जवळ कुठलाही ओळखीचा पुरावा आढळुन न आल्याने पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडिया माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.

 

दरम्यान सोशल मिडिया व प्रिंट मिडिया वर बातमी प्रसिद्ध झाल्याने अखेर मयत इसमची ओळख पटली असुन मयताचे नाव राजेंद्र भागवत बाविस्कर (वय – ३५) रा. बांबरुड (राणीचे) ह. मु. जनता वसाहत, पाचोरा असे आहे. मयत राजेंद्र बाविस्कर हे हातमजुरीचे काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. २१ जुन रोजी ते रेल्वे लाईन क्रास करत असतांनाच हा अपघात होवुन राजेंद्र बाविस्कर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मयत राजेंद्र बाविस्कर यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचे राजेंद्र बाविस्कर यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.‌ या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहे.

Protected Content