नांदुरा बाजार समिती सभापतीपदी धांडे तर डॉ. हेलगे उपसभापती !

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कॉंग्रेसचे भगवान धांडे तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे डॉ.प्रदीप हेलगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

 

नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली होती. या अटीतटीच्या  निवडणुकीत भाजपला पराभूत करत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले होते. कॉंग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी हा विजय साकार केला होता.

 

या अनुषंगाने बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार होते. यासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये  नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार राजेश एकडे यांचे खंदे समर्थक भगवान धांडे यांची तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनमिळावू आणि सतत हसरा चेहरा असणारे सर्वांच्या कामात उपयोगी पडणारे डॉ.प्रदीप एकनाथराव हेलगे यांची आज बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

 

यावेळी सर्व कॉंग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे व शिवसेना सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. यामध्ये सर्वानुमते ही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. निवडीची घोषणा होताच आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content