धारदार तलवारीसह एका हद्दपार आरोपीला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।

जळगाव तालुक्यातील कानळदा गावातुन दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला बुधवार, २४ मे रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून २ फूट लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.आकाश इच्छाराम सपकाळे रा. कानळदा असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.

 

आकाश इच्छाराम सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्याहून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार असतांनाही आकाश बुधवारी सोबत लोखंडी तलवार बाळगून कानळदा गावात फिरत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास आकाश सपकाळे याला अटक केली. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जपत करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत ठाकूर याच्या फिर्यादीवरुन आकाश सपकाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.

Protected Content