तरुणाची दुचाकीसह मोबाईल लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथील बसस्थानकावरुन तरुणाचा मोबाईल तसेच दुचाकी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार, १० मे रोजी साडे दहावाजेच्या सुमारास नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे करण अरुण बारी हा तरुण वास्तव्यास आहे. तो खाजगी नोकरी करतो. ८ मे रोजी करन हा त्याच्या एम.एच. १९ डी.के. ०९०८ या क्रमाकांच्या दुचाकीने नशीराबाद बसस्थानकावर आला होता. यादरम्यान त्याने त्याची दुचाकी नशीराबाद बसस्थानकावर उभी केली होती. यादरम्यान करन याची दुचाकी तसेच मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. प्रकार समोर आल्यानंतर करने याने मोबाईल तसेच दुचाकीचा शोध घेतला मात्र मिळून न आल्याने दोन दिवसानंतर १० मे रोजी करन याने नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संजय जाधव हे करीत आहेत.

Protected Content