ठाकरे गटाचे उरलेले खासदार व आमदार लवकरच शिंदेंसोबत !

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे उरले-सुरलेले खासदार आणि आमदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार असल्याचा दावा आज खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश असला तरी सर्वच पक्षांची आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्त जागांची मागणी केली आहे. या संदर्भात बोलतांना शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

ठाकरे गटाच्या खासदारासोबत आमची काल बैठक झाल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे. हे खासदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. ऊर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत इतर पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला. तरी उद्धवजी काही बोलत नाहीत, असे देखील तुमाने म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content