टाकरखेडा येथील शेतकऱ्याच्या बैलजोडीची चोरी

यावल लाईव्ह टाइम्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील टाकरखेडा गावातील शेतकऱ्याची मालकीची ४० हजार रूपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची  घटना समोर आली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम गंगाधर पाटील (वय-६५, रा. टाकरखेडा ता. यावल) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ मे रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीचे बैलजोडी घरासमोर बांधलेले होते. मध्यरात्री २ वाजेच्या नंतर अज्ञात चोरट्याने घरासमोर बांधलेले. ४० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरून नेली. हा प्रकार पहाटे ४ वाजेच्या सुमारास शांताराम पाटील यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरात शोधाशोध केले असता कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी ५ मे रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content