जळगावात विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका भागात २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागात विवाहिता वास्तव्यास आहे. यादरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजता शुभम ज्ञानेश्वर सुतार याने विवाहितेसोबत तिला लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत विवाहितेने रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून शुभम ज्ञानेश्वर सुतार या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

Protected Content