चांगदेव येथे तापी नदी जन्मोत्सव सोहळा साजरा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे सुर्यकन्या तापीमाई जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विधिवत पुजा करून तापी नदीला साडी व चोळी अर्पण करण्यात आली.

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे नावाडी संघटना, मासेमारी बांधव, शेतकरी बांधव व मजूर यांच्यावतीने सुर्यकन्या तापीमाई यांचा जन्मोत्सव सोहळ्या साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई व भारती भोई तसेच आ. चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रविण चौधरी व सौ चौधरी, सरपंच निखिल बोदडे, अंजली बोदडी व माजी सरपंच पंकज कोळी व उर्मीला कोळी यांच्याहस्ते १०८ मिटर अखंड साडी व चोळी अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर नागरीक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी आलेल्या सर्व भाविकांसाठी नावाडी संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content