जळगाव, प्रतिनिधी । आमदार राजुमामा भोळे यांची जळगाव जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगाव शहर महानगरतर्फे त्यांचा ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
आमदार राजुमामा भोळे यांची जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, म.न.पा चे गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेन्द्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील माळी, प्रदीप रोटे, सुभाष सोनवणे, सुशील हसवाणी, अमीत भाटिया, चंदन महाजन, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, महेश चौधरी, विठ्ठल पाटील, भगतसिंग निकम, बापू ठाकरे, जिल्हा कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, श्री जगदीश जोशी, केदार देशपांडे, शक्ती महाजन, अजित राणे, संजय लल्ला, माधव सोनवणे, संजय तिरमाले, संजय भावसार यांच्यासह जळगाव महानगरचे सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.