आ. चंद्रकांत पाटलांमुळे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा : मिळाली मुदतवाढ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज डिप्लोमा प्रवेशासाठी शेवटचा दिवस असतांना देखील सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. याची दखल घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून यासाठी मुदतवाढ मिळवली.

 

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या डिप्लोमा अर्थात पदवीका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारचे दाखल मिळण्यात विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत. यातच सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झालेले आहेत. परिणाम अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असल्याचा धोका होता. ही व्यथा विद्यार्थी आणि पालकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कानावर टाकली.

 

या अनुषंगाने आमदार चंदूभाऊंनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कॉल लाऊन त्यांना या समस्यांबाबत अवगत केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी केलेल्या मागणीनंतर मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार असल्याची घोषणा केली. अर्थात, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Protected Content