अंगणवाडीवरील सोलर पॅनलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील अंगणवाडीच्या छतावरील १५ हजार रुपये किमतीचे सोलर पॅनल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी शनिवारी १३ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अंगणवाडी सेविका चित्रा रमेश चौधरी (वय ३५, रा. कडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ११ ते १२ मे च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी अंगणवाडीच्या छतावर बसविलेल्या एक काळ्या रंगाचे ४ बाय ८ लांबी रुंदीचे सोलर पॅनल चोरून नेले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तपास मपोना सुनीता मधुकर लेले करीत आहेत.

Protected Content