एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद संपाला जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांचा पाठींबा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव आगारात गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद संपला भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे आणि भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे यांनी शनिवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर पाठींबा दिला आहे. अत्तरदे दाम्पत्याने पाठींब्याचे पत्र देण्यात आले.

 

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेले एसटी कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबर पासून कामबंद संप पुकारला आहे. याला ठाकरे सरकार जबाबदार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ठाकरे सरकारने मान्य कराव्यात आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. पत्रा नमूद केले आहे की, शिकावू चालकांना ट्रेनिंग देवूनही त्यांना कामावर हजर केले नाही, आता १ दिवसांची ट्रेनिंग देवून काही कर्मचाऱ्यांना कामावर हजर करत आहे. यात बस चालवतांना काही अपघात झाल्यास याला जबाबदार कोण आहे, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलन हे चुकीचे नाही तुम्ही कर्मचाऱ्यांना भडकावून आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल चुकीचे शब्द वापरले जात आहे ते रोखावे, या मागण्या पत्रात नमूद केल्या आहे.

 

<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?height=280&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Flivetrendsnews01%2Fvideos%2F623644832382531%2F&show_text=false&width=560&t=0″ width=”650″ height=”350″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share” allowFullScreen=”true”></iframe>

Protected Content