Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध गौणखनिज प्रकरणात अखेर दाखल होणार गुन्हे

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी बनावट पावत्यांच्या आधारे अवैध गौणखनिजाचा वापर केल्या प्रकरणी अखेर जि.प. सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसिंचन विभागातील गौण खनिज घोटाळा खूप गाजत असला तरी यावर अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जळगावसह पाचोरा, भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी १४ ठेकेदारांनी रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांच्या वापर करून शासनाला चुना लावल्याचे हे प्रकरण जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यात १४ ठेकेदारांचा समावेश असल्याने जि.प. मध्ये खळबळ उडाली आहे. तर, यासोबत लघुसिंचन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर देखील कारवाईची शक्यता आहे. या प्रकरणी आता केव्हा गुन्हे दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version