Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जि.प. निवडणूक : महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले

mahavikasaaghadi 209700 201911328139

जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे ठरले आहेत. त्यानुसार अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रेखाबाई दीपक राजपूत तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज घेतांना जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली होती.

 

 

महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील आणि रेखाबाई दीपक राजपूत या दोघांचे तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे मनोहर गिरधर पाटील आणि नानाभाऊ महाजन यांनी अर्ज घेतले असल्याची माहिती जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी दिली होती. परंतू उमेदवारी अर्ज भरतांना मात्र, अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रेखाबाई दीपक राजपूत तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकंदरीत जिल्हा परिषदमध्ये नाट्यमयरित्या मोठ्या घडामोडी सुरु असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version